ठाकुरदास परदेशी यांनी साकारला ‘सिंहगड’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-दुर्गप्रेमी ठाकुरदास परदेशी व त्यांचे कुटुंबीय गेल्या दहा वर्षापासून दिवाळी निमित्त आपल्या घराच्या आवारात महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती तयार करतात.

यंदा त्यांनी सिंहगड (कोंढाणा) किल्ल्याची प्रतिकृती माती, शेण, बारदान इत्यादीचा वापर करून साकारली आहे. आठ फुट रुंद व चार फुट ऊंचीची ही प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती शांतीकुंज, शांतीनगर पाण्याच्या टाकी जवळ, नामगंगा रिसॉर्टच्या पुढे, शांतीनगर, अहमदनगर या ठिकाणी सर्वांना पाहण्यासाठी दि.30/11/2020 पर्यंत खुली आहे.

अधिक माहितीसाठी मो.9860207076 या नंबरवर संपर्क साधावा. दुर्गप्रेमी ठाकुरदास परदेशी यांनी गेल्या सोळा वर्षा पासून एकून 175 गड किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.

लोकांना विशेषत: लहान मुलांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम ते राबवतात. आतापर्यंत त्यांनी शिवनेरी, तोरणा, राजगड, पुरंदर, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इ. किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment