कष्टकऱ्यांची भाऊबीज हा कष्टाला प्रतिष्ठा देणारा उपक्रम – आ. विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-ऊस तोडणी मजूरांसाठी कष्टकऱ्यांची भाऊबीज या उपक्रमातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे समाधान भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र मंडळाच्या वतीने ऊस तोडणी कामगारांसाठी कष्टकऱ्यांची भाऊबीज या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ऊसतोड मजूरांना कपड्यांचे वाटप आ.विखे यांच्या हस्ते करणयात आले.

प्रांरभी ऊस तोडणी महीला कामगारानी आ.विखे यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली.कार्यक्रम अध्यक्ष स्थानी विश्वास कडू पाटील होते. आपल्या भाषणात आ विखे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून राज्यात ऊस तोडणी मजूरांसाठी प्रथमच असा उपक्रम होत असेल.अतिशय लांबून येवून कष्ट करणार्या या मजूरांकडून आपण हक्काने अपेक्षा करतो.

पण त्यांच्या समस्यांसाठी सुध्दा आपण पुढे आले पाहिजे. ऊस तोडणी मजूरांसाठी विमा योजना सुरू करण्याचा पहीला निर्णय विखे पाटील कारखान्याने घेतला.ऊस. तोडणी मजूरांच्या संरक्षणा बरोबरच त्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा सुध्दा राखली गेली पाहीजे आणि हे महत्त्वपूर्ण काम युवकांनी केल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

याप्रसंगी सतिष कानवडे रखमाजी खेमनर यांची भाषण झाली कार्यक्रमास भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ नंदूशेठ राठी,मित्र मंडळाचे सुनील जाधव, बंटीशेट लगड, मंगेश शिंदे, आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment