या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या पार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे.

तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यात दोन दिवसांत 36 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 2642 झाली आहे.

सोमवारी तालुक्यातील 14 गावांतून 20 करोना संक्रमित आढळले तर मंगळवारी 16 संक्रमित आढळले. सोमवारी नेवासा शहर व मुकिंदपूर येथे प्रत्येकी तिघे तर प्रवरासंगम व नेवासा बुद्रुक येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

चिलेखनवाडी, गणेशवाडी, शिरेगाव, भेंडा बुद्रुक, पिचडगाव, रांजणगाव, माळीचिंचोरा, सांगवी, बेलपिंपळगाव व लोहारवाडी या 10 गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळला.

काल मंगळवारी 8 गावांतून 16 संक्रमित आढळले. नेवासा शहरातील 5 जण संक्रमित आढळले. पिचडगाव येथील तिघे तर रांजणगावदेवी व सोनईतील प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

नेवासाफाटा, खुणेगाव व तरवडी येथील प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. अशाप्रकारे दोन दिवसांत तालुक्यात एकूण 36 करोनाबाधित वाढले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2 हजार 642 झाली आहे.

नागरिकांनी कोविडचे गांभिर्य लक्षात घेवून खरेदीसाठी बाहेर पडताना सर्व निकषांचे पालन करण्याची गरज आहे. मंगळवारी वाढलेली शहरी रुग्णांची संख्या पाहता ‘नागरिकांनो सावधान! रुग्णसंख्या वाढत आहे..’ असे सांगण्याची वेळ आली आहे.

Leave a Comment