निवडणुकीची रणधुमाळी; प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात बिहारमध्ये यशस्वीरीत्या निवडणूक पार पडल्या होत्या. त्यांचे निकाल देखील हाती आले. देशातील या महत्वपुर्ण निवडणुकीनंतर आता नगर जिल्ह्यातही निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

नुकतेच शेवगाव येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, 21 प्रभागांची आरक्षण सोडत आज (शुक्रवारी) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नितीन बनसोडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली

. यामध्येअनुसूचित जातींसाठी 03, मागास प्रवर्गासाठी 06, तसेच सर्वसाधारण महिलांसाठी 06 प्रभाग आरक्षित करण्यात आले. यामुळे 21 पैकी 11 प्रभाग सर्व प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव झाले आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण असे ः सर्वसाधारण महिला ः प्रभाग क्रमांक 5, 6, 8, 10, 12, 15, अनुसूचित जाती पुरुष ः प्रभाग क्रमांक 9, अनुसूचित जाती महिला ः प्रभाग क्रमांक 19 व 21, नागरिकांचा मागास प्रवर्ग- पुरुष ः प्रभाग क्रमांक 7, 14, 20, नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला ः प्रभाग क्रमांक 13, 16, 17, खुला ः प्रभाग 1, 2, 3, 4, 11, 18.

अनेक नगरसेवकांचे प्रभाग मागास प्रवर्गासाठी, तसेच महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची पंचाईत झाली असली, तरी महिला राखीव प्रभागात आपली पत्नी किंवा घरातील महिलेस पुढे करावे लागणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment