सरकारी अधिकारी ८० हजारांची लाच घेताना पकडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे (५७, सिव्हिल हडको) हिला तब्बल ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली.

तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्रात सहायक पदावर काम करतात. सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत ते वैद्यकीय रजेवर होते. या काळातील वेतन त्यांना मिळाले नव्हते.

हे वेतन मिळावे, यासाठी त्यांनी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांचे १ लाख ३९ हजार रुपयांचे वेतन बँकखात्यात जमा करण्यात आले.

मात्र, हे वेतन जमा केले म्हणून खुणे हिने त्यांच्याकडे ६० टक्के याप्रमाणे ८४ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी ८० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिला रंगेहाथ पकडले.

सिव्हिल हडको परिसरातील निसार हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना एका महिला अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे लाचेची मागणी केली

गेल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment