बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा एकदा बिबट्याने प्राण्यांना आपले भक्ष करण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यातील कापुरवाडी येथे बिबट्याने सुरेश शिंदे याच्या जर्शी गायचे वासरु वर बिबट्याने शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी रात्री हल्ला करूण ठार मारले.

सकाळी लक्षात आल्यावर कापुरवाडी ग्रामस्थ व शिवसेना तालुका प्रमुख राजेद्र भगत व सरपंच संभाजिराजे भगत यांनी वनविभागास कळविले. तालुका वन विभाग प्रमुख थीटे साहेबांनी लगेच अधिकारी पाठवुन देऊन पंचनामा केला.

कापुरवाडी परीसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात तातडीने पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment