फडणवीस, बावनकुळे,ठाकरे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली,पण जनतेला सांगतात बिलं भरू नका..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-  राज्यात वीजबिल माफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच वीजबिल माफ व्हावे यासाठी सर्वसामान्य नागरिक देखील रस्त्यावर उतरला आहे.

तसेच यावेळी महावितरणचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान वीजबिल मुद्द्यावरून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. मनसेने वीजबिल माफीवरुन आक्रमक भूमिका राज्यभर आंदोलन केलं.

तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.

मात्र वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली आहेत,

पण जनतेला सांगतात बिलं भरू नका हा कुठला न्याय आहे?, असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफ करण्याची घोषणा करुन त्यानंतर आपला शब्द फिरवून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. यावर नितीन राऊत यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

ऊर्जामंत्र्यांच्या या स्पष्टीकरणाला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले कि, आम्ही वीजबिल भरुच आणि ते भरायलाच हवं. नितीन राऊत यांनीही ते भरायला हवं.

प्रश्न लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांचा नाही. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब जनतेचा आहे. त्यांना आलेली हजारो रुपयांची बिलं ते भरणार कुठून? हा प्रश्न आहे”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment