कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात चाललंय काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.  त्यातच महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात सध्या कायदा – सुव्यवस्था अक्षरश वाऱ्यावर असलेली दिसून येत आहे. 

संगमनेर शहरातील एका मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या खोलीमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 1 लाख 3 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. तर शहराजवळील सुकेवाडी येथील गोसावी मळ्यातही अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह इतर साहित्य असा एकूण 68 हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या शुक्रवारी (ता.27) उघडकीस आल्या आहेत.

यामुळे शहरासह परिसरात पुन्हा चोर्‍यांचे सत्र सुरू झाले असून, पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले येथील निवृत्ती चिमाजी सेनकर यांच्या मुलाचे लग्न संगमनेरातील एका मंगल कार्यालयात होते.

तेथे नवरदेवाला खोली देण्यात आलेली होती. तिथे नवरदेवाच्या खोलीमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 1 लाख 3 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी निवृत्ती सेनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे.

तर दुसर्‍या घटनेत सुकेवाडी शिवारातील गोसावी मळा येथील अनिता मच्छिंद्र गोसावी यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम 60 हजार रुपये, 5 हजार रुपये किंमतीच बॅटरी आणि 3 हजार रुपये किंमतीचा मिक्सर असा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वाढत्या चोऱ्यांचे सत्र पाहता संगमनेर मध्ये पोलीस प्रशासन काय करत आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment