आता फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे.

भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असून भाजपाचा प्रचार जोर पाहता आता फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे.

शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी इथे रोड शो केला. तसेच संध्याकाळी एका सभेला संबोधित केले होते. तर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये रोड शो केला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे. दरम्यान, या प्रचारावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

ही निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाही. नरेंद्र मोदींच्या जागी पंतप्रधानपदाची निवडणूक होत की काय असे वाटतेय असा टोला ओवेसी यांनी एका रॅली दरम्यान लगवाला. १ डिसेंबर रोजी जनता डेमोक्रॅटिक स्ट्राइक करेल असेही ओवेसी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment