आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? आण्णा भडकले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरु आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केंद्राला चांगलेच झापले आहे.

तसेच शेतकरी आंदोलनावरून अण्णांनी थेट मोदी सरकारला सवाल केला आहे. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, तर मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाहीत? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का?

उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?’ असे सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारला उद्देशून उपस्थित केले आहेत. या आंदोलनाला हजारे यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे.

यावेळी हजारे म्हणाले, ‘कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी ही वागणूक योग्य नाही. निवडणुका आल्या की राजकारणी मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर, घरी जाऊन मतं मागतात. मग त्यांच्या मागण्यासंबंधी त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला आहे. तरीही अद्यापही शेतकरी संयमाने आंदोलन करीत आहेत. यातून हिंसा भडकली तर याला जबाबदार कोण,’ असा सवाल करून हजारे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. दरम्यान कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी झाले आहेत.

दिल्लीच्या सिंधु सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावालाही शेतकऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर असलेल्या निरंकारी समागम मैदानावर जाण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment