एकनाथ खडसें करणार मोठा खुलासा… राज्यात चर्चांना उधाण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-एकनाथ खडसें हे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (HRB) गैरव्यवहार प्रकरणी मोठा खुलासा करणार आहेत. यामुळे राज्यात चर्चांना उधाण आला आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहरप्रकरणी कागदपत्रांसह, पत्रव्यवहारही आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. याबाबत ते घोटाळेबाजांचे नाव येत्या दोन दिवसांत उघड करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसेंनी असे आरोप केले आहे की, या प्रकरणात बँकेची मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केली गेली आहे. तसेच या घोटाळ्यात जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांचा सुद्दा समावेश आहे. असे खडसे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाबाबत बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून एकनाथ खडसेंनी तक्रारी केल्या आहेत. रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवरुन कीर्ती पाटील यांनी देखील अनेक वेळा तक्रार केली आहे.

असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. राज्य सरकारकडे तक्रार केली असता सरकारनेही या प्रकरणात कारवाई थांबवली होती. असे सांगून एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment