तिसरीही मुलगी झाली, सासरच्यांनी सुनेला घराबाहेर काढले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- आजही वंशाचा दिवा म्हणूंन समाजात मुलांना प्रथम स्थान दिले जाते. यामुळे आजही स्त्री जन्माचे स्वागत होण्याऐवजी त्यांची भ्रूण हत्या केल्याचे प्रकार घडत आहे.

मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी सुनेला थेट घराबाहेर काढल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने तिला थेट घराबाहेर हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार भिंगारच्या सैनिक नगर मध्ये घडला आहे. याप्रकरणी त्या महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

सुनीता प्रकाश साखरे मशिया फिर्यादी महिलेचे नाव आहे . या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश उत्तम साखरे हौसाबाई साखरे, उत्तम काशिनाथ साखरे, विकास साखरे, हरी साखरे, आशाबाई साखरे, सुशिलाबाई साखरे सर्व राहणार आष्टी जिल्हा बीड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

सुनिता साखरे या सासरी नांदत होत्या तीन मुली झाल्याने आम्हाला मुलगी नको मुलगा पाहिजे असे म्हणत घरातील सदस्यांकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता.

पती प्रकाश साखरे, सासू-सासरे, दीर आणि जावेने दमदाटी करून शिवीगाळ घराबाहेर हाकलून देण्याची सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आर एस वराट करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment