सीरमसह कोरोनाच्या ‘ह्या’ 4 लस अंतिम टप्प्यात ; जाणून घ्या प्रत्येक लशीबाबत सर्व डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला तर अनेक देशांची आर्थिक चक्रे थांबवली. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लशीकडे लागून आहेत. यासाठी अनेक कंपन्या कोरोना लस बनवण्यात पुढे शेत. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही लस शर्यत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली आहे.

चार कंपन्या त्यांच्या तिसऱ्या टप्प्यामधील चाचणीच्या अंतिम टप्प्यातील म्हणजेच मानव चाचण्यांचे निकाल जाहीर केले आहेत. आतापर्यंत या चारही कंपन्यांनी त्यांचा एफिकेसी रेट 90% असल्याचे घोषित केले आहे. चला याठिकाणी जाणून घेऊयात कोणत्या कंपनीची लस कोणत्या स्टेपमध्ये आहे याविषयी

1. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी/ एस्ट्राजेनेका (ब्रिटेन)

तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस (कोवीशील्ड) 90 % पर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, कोवेशिल्डची किमान 100 दशलक्ष डोस तयार होतील.

जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले की, आतापर्यंत 40 लाख डोस तयार झाले असून 225 रुपयांना केंद्र सरकार हे खरेदी करण्यास तयार आहे. पूनावाला म्हणाले की, खासगी बाजारात कोवीशील्डचा एक डोस 500 ते 600 रुपयांना मिळणार आहे. यामुळे वितरकांनाही फायदा होईल.

2. फायझर आणि बायोएनटेक (अमेरिका)

अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक संयुक्तपणे कोरोना लस विकसित करत असून ती लस फेज -3 चाचणीत 95% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार वृद्ध लोकांसाठी ही लस चांगली काम करते. हे कोणतेही गंभीर दुष्परिणाम देखील दर्शवित नाही. फायझर डिसेंबरपर्यंत या लसचे 5 दशलक्ष डोस तयार करणार आहे.

कंपनीने आपत्कालीन मंजुरी मिळविण्यासाठी यूएस फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (USFDA) कडे अर्ज केला आहे. फायझरच्या फेज -3 चाचणीत सुमारे 44 हजार लोक सहभागी झाले होते. यापैकी 170 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यापैकी 162 रुग्णांना लसऐवजी प्लेसिबो देण्यात आले होते.

3. मॉडर्ना (अमेरिका)

अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना यांनी असा दावा केला आहे की उत्पादित लस कोरोना रूग्णांच्या संरक्षणासाठी 94.5% प्रभावी आहे. क्लिनिकल चाचणीच्या शेवटचा टप्पामधील निकालाच्या आधारे हा दावा केला गेला आहे.

विशेष गोष्ट अशी आहे की ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तपमानात 30 दिवस सुरक्षित राहू शकते. फेज-3 चाचणींमध्ये अमेरिकेतील 30,000 हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापैकी 65 हून अधिक लोक उच्च जोखमीच्या स्थितीत आणि विविध समुदायातील होते.

4. गामालेया रिसर्च इंस्टिट्यूट (रशिया )

रशियन-निर्मित लस स्पुतनिक व्ही चाचणी दरम्यान कोरोनाशी लढण्यात 95% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या प्राथमिक विश्लेषणात हे उघड झाले आहे. पहिल्या डोसच्या 28 दिवसांनंतर या लसीमध्ये 91.4% कार्यक्षमता दिसून आली.

पहिल्या डोसच्या 42 दिवसानंतर, ती 95% पर्यंत वाढली असा ही लस बनविणार्‍या गामालेया नेशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबॉयोलॉजी सेंटरने दावा केला आहे.

या लसीचे दोन डोस 39 संक्रमितांसह इतर 18,794 इतर रुग्णांना देण्यात आले. हे औषध रशियामध्ये विनामूल्य उपलब्ध असेल. जगातील इतर देशांसाठी त्याची किंमत 700 रुपयांपेक्षा कमी असेल. रशियाने 2021 मध्ये 50 करोड़हून अधिक लोकांसाठी लस तयार करण्यासाठी इतर देशांच्या भागीदारांशी करार केला आहे. रशियन संस्थेने डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळेशी करार केला आहे आणि फेज -2 / 2 साठी भारतातएकत्रित चाचण्या सुरू झाल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment