या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय चांगला भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 नगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या आवक मध्ये २ हजार गोण्याची घट झाली.

गावराण कांद्याला भाव जास्तीत जास्त ४ हजार रुपये पर्यंत होता तर लाल कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव निघाले. काल गावरान कांद्याची ३७ हजार १९७ गोण्या आवक झाली.

एक नंबर दर्जा असलेल्या कांद्याला साडेतीन हजार ते चार हजार रुपये तर दोन नंबरला २८०० ते ३००० हजार रुपये तर तीन नंबरला पाचशे ते एक हजार रुपये आणि गोल्टी कांद्याला २५०० ते २८०० रुपये पर्यंत भाव मिळाला.

लाल कांद्याची एकुण ९७५ गोण्यांची आवक झाली एक नंबर दर्जा असलेल्या कांद्याला ३५०० ते ४५०० हजार रुपये तर दोन नंबरला ३००० ते ३५०० हजार रुपये तर तीन नंबरला ५०० ते १००० रुपये भाव मिळाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment