तोकडे कपडे घालून साई मंदिरात येऊ नये; मंदिर प्रशासनाचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली केली.

यातच जगभर ख्याती असलेलं शिर्डीचे साईमंदिर देखील खुले केले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून येथे दर्शन सुरु करण्यात आले आहे. यातच कपडे परिधानावरून मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे.

शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून केले आहे. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी भारतीय पेहरावात यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. भक्तगण दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येत आहेत.

अशी तक्रार यापूर्वी काही भक्तांनी साईबाबा संस्थानकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत, साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment