मोटो G 5G स्मार्टफोन लॉन्च; 25 हजारांचा मोबाईल खरेदी करा केवळ 5700 रुपयांत; कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- मोटो जी 5 जी अनेक टीझर्सनंतर भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. हा फोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे आणि त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि एक 5000 एमएएच बॅटरीचा समावेश आहे.

48-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर असलेल्या फोनच्या मागील पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची किंमत 24999 रुपये आहे. परंतु तुम्ही हा फोन 5700 रुपयांत खरेदी करता येईल. जाऊन घेऊयात याविषयी

भारतात मोटो जी 5 जी ची वास्तविक किंमत 24999 रुपये आहे, ही त्याच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे, परंतु सध्या 4000 रुपयांच्या सवलतीत तो 20999 रुपयांना विकला जात आहे.

हा फोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे आणि लॉन्च ऑफरमध्ये एसबीआय आणि अ‍ॅक्सिस कार्डवर 5 टक्के कॅशबॅकचा समावेश आहे. एचडीएफसी बँक कार्डवर एक हजार रुपयांची सूट मिळत आहे, म्हणजे तो 19,999 रुपयात खरेदी करता येईल.

मोटो जी 5 जी फोन Volcanic Grey आणि Frosted Silver कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. फ्लिपकार्ट फोनवर 14300 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही देत आहे. एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल.

म्हणजेच आपण एचडीएफसी बँक कार्ड ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा फायदा घेत असाल तर फोन केवळ 5700 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. [20999 (फोन किंमत) -1000 (एचडीएफसी ऑफर) -14300 (एक्सचेंज बोनस) = 5699 रुपये]

फोनचे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 20: 9 आस्पेक्ट रेशियोसह 6.7-इंचाचे 1080 पी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतचा स्टोरेज मिळेल.

मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. या व्यतिरिक्त मोटोरोलाच्या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर मोटो जी 5 जी मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020,

Leave a Comment