पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यात पोलीस पथकाने वाळू तस्कारांवर धडाकेबाज कारवाई केली आहे, यामुळे वाळू तस्करांची चांगलेच धाबे दणाणले आहे.

वाळू वाहतुकीचे कोणतेही परवाने नसताना अवैध वाळू उपसा प्रकार हा भीमा नदी पात्रात सुरु असल्याने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कडक कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा शिवारातील भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या २७ लाख रुपये किमतीच्या तीन फायबर बोटी व तीन सेक्शन पंप जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.

याप्रकरणी बाबुराव राजू पाटोळे (रा. दौंड जि. पुणे) व सोनू व्यंकटेश बाल्याळ (रा. शालीमार चौक ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाबुराव राजू पाटोळे यांच्या दोन बोटी तर सोनू व्यंकटेश बाल्याळ यांच्या एक बोटीचा समावेश आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment