विजय माल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता जप्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-भारतातून फरार झालेल्या विजय माल्याची फ्रान्समधील 14 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केलीय. ईडीच्या सूचनेनंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता जप्त केली आहे.

विजय माल्याने स्टेट बँकेसह इतर बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडविले आहेत. त्यानंतर तो परदेशात पळाला. विजय माल्ल्याची आता फ्रान्समधली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.

युरो 1.6 मिलियन अर्थात सुमारे 14 कोटींची ही मालमत्ता आहे. ही कारवाई केल्यानंतर फ्रान्समधील तपास यंत्रणांने याबाबतची माहिती दिली. दरम्यान, ईडीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फ्रान्समधील तपास यंत्रणांना विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याबाबत सांगितले होते.

त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.जानेवारी 2019 मध्ये विजय माल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत न्यायालयाने फरार आरोपी घोषित केले. मार्च 2019 पासून तो लंडनमध्ये वास्तव्य करीत आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ब्रिटनमध्ये विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातला खटला सुरु आहे. यापूर्वी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला विजय मल्ल्याच्या वकिलांनी आव्हान दिले. तसेच विजय माल्ल्याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विनंती केली.

भारत सरकारने याप्रकरणी विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावे अशी विनंती केली आहे. विजय माल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून सुमारे 7 हजार कोटींचे कर्ज देण्यात आले होते. व्याज आणि दंड यांची रक्कम मिळून 12 हजार कोटींचा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment