शिर्डीत माणूसकीची भावना जपत अंत्यविधीसाठी मोफत सरपण देणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नगरपंचायतीच्या वतीने शिर्डी नगरपंचायत हद्दीत होणाऱ्या अंत्यविधीसाठी यापुढे मोफत सरपण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.

याबाबतच्या खर्चासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितला. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना गोंदकर यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, पाणी, स्वच्छता या मुलभूत कामांबरोबरच सर्वसामान्य शिर्डीकरांच्या हिताच्या काही वेगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, अशी भावना असल्याने याकामाचा सातत्याने पाठपुरावा केला.

मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपनगराध्यक्ष सचिन कोते व सर्व नगरसेवकांनी याकामी सहकार्य केल्यामुळेच हा निर्णय होऊ शकला, असे नगराध्यक्ष गोंदकर यांनी म्हटले आहे.

माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, माजी नगरसेवक देवानंद शेजवळ, देवरामभाऊ सजन, शिर्डी दूध डेअरीचे बाळासाहेब जगताप, भास्कर कोते, संदीप पारख, केशव गायके, विनायक रत्नपारखी यांच्यासह शिर्डीतील सर्व सामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Leave a Comment