१०० दिवसांत १० कोटी लोकांना देणार कोरोनाची लस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- ट्रम्प प्रशासन राबवत असलेली लसीकरण मोहीम हे एक मोठे अपयश असल्याचा आरोप करत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांनी नव्या लसीकरण कार्यक्रमाची घोषणा केली.

सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत १० कोटी अमेरिकन नागरिकांना लस देण्याचे आश्वासन बायडेन यांनी दिले आहे. बायडेन येत्या २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.

कोरोना महामारी हे त्यांच्या प्रशासनापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या आरोग्य संकटाचा सामना करण्याची रणनीती आखण्यासाठी शुक्रवारी त्यांनी आपल्या प्रस्तावित प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बायडेन यांनी आपला लसीकरण कार्यक्रम जाहीर केला. देशात सुरू असलेली लसीकरण मोहीम अपयशी ठरली आहे. लस नक्की कोणाला द्यायची, हे आरोग्य कर्मचाऱ्यांनाच माहीत नाही.

लाखो डोस डोस शीतकपाटांमध्ये पडलेले आहेत; मात्र ज्यांना गरज आहे त्यांना लस देण्यातच येत नाहीये, अशी टीका बायडेन यांनी केली. देशाचे आरोग्य पणाला लागले आहे.

त्यामुळे आम्ही लसीकरणाची नवी योजना आखली आहे. लसीकरणासाठीचा प्राधान्यक्रम आम्ही ठरवला आहे. यासंदर्भात राज्यांशी बोलून तत्काळ त्या दृष्टीने मोहीम राबवण्यात येईल.

पहिल्या १०० दिवसांत १० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे आमचे ध्येय आहे. हे शक्य आहे का, असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतील; परंतु आम्हाला हे शक्य करावेच लागेल, असे बायडेन म्हणाले.

Leave a Comment