अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या मिनी बसचा अपघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- अहमदनगर ते जामखेड रस्त्यावर कडा (ता.आष्टी) परिसरात लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या मिनी बसला अपघात झाला. यामध्ये कल्याण येथील वीस जण जखमी झाले आहेत.

जखमींवर कडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील विवाह समारंभासाठी कल्याण येथून मिनी बसमधून वर्‍हाड आले होते.

विवाह आटोपून रात्री कल्याणकडे परतत असताना कड्याजवळील कर्डिले वस्ती येथे बस पलटी झाली. या अपघातात विघ्नेष श्रावण बनसोडे, मिहीर श्रावण बनसोडे, श्रावण बनसोडे, कवू भगवान कांबळे,

चंची श्रावण बनसोडे, शशिकांत जाधव, विलास डाडर, राजाबाई डाडर, सुनील पवार, सुनीता जाधव, अजय जाधव, धोंडबाई जाधव, बाळू कसबे, विराज जाधव,

पवन जाधव, कालिंद जाधव, अनिकेत जाधव, कनिराम राठोड व चालक सुनील पवार जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली.

Leave a Comment