ब्रेकअप झाल्याने तरुणाने केले तरुणीचे अपहरण मात्र…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आले होते.

याप्रकरणी अवघ्या सहा तासाच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केली. शंतनू चिंचवडे (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचे आणि आरोपी शंतनूचे काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप करत संबंध तोडले होते.

यावरून आरोपी चिडलेला होता. त्यामधूनच त्याने तरुणीचे अपहरण केले असल्याचं समोर आले आहे अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली तरुणी उच्चशिक्षित आहे.

ती एका शॉपमध्ये काम करते. मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास आरोपी शंतनू ऑफिसमध्ये आला आणि पिस्तुल दाखवून संबंधित तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण केले. तरुणीने आरडाओरड करत मदतीची याचना केली.

मात्र कोणीच मदतीला धावले नाहीत. याच दरम्यान, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

त्यांनी तात्काळ चिंचवड पोलीस ठाणे गाठत माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी वेळ न घालवता तपासाची चक्रे फिरवली. यावेळी आरोपी तळेगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. अवघ्या सहा तासाच्या आत तरुणीची सुखरूप सुटका पोलिसांनी केली.

Leave a Comment