निवडणुकीतील पराभव हा भाजपच्या धोरणांचे अपयश – महसूलमंत्री थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर जनतेने मोठा विश्वास पुन्हा एकदा दाखविला आहे.

निकालाच्या आकडेवारीतून हे स्पष्ठ देखील होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जनता हि महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान निवडणुकीच्या निकालावरून राज्यात भाजपची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. हे भाजपच्या धोरणाचे अपयश असून, त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही.

भाजप नेत्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर केली. त्यांनी केलेला दावा खोटा आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा,

अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारुण पराभव करत, महाराष्ट्र विकास आघाडीला कौल दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले असून, ५० टक्क्याहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे.

विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला.

Leave a Comment