शेतकऱ्यांचा महावितरणच्या वसुली मोहिमेस विरोध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- थकित वीजबिले वसुलीसाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

प्रत्येक शेतीपंपधारकाने पाच हजार रुपये भरावेत व वीजरोहित्रावरील सर्व शेतकरी ग्राहकांनी पैसे भरले तरच रोहित्राचा वीजपुरवठा सुरू करू, असा निर्णय वीजवितरण कंपनीने घेतला आहे.

यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी महावितरणच्या कारभारावर नाराज झाले आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांकडून अडीच हजार रुपये घेऊन वीजपुरवठा सुरू करावा,अशी मागणी इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने वीजकंपनीचे उपकार्यकारी अभियंता नीलेश मोरे यांच्याकडे केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील बळीराज़ा वादळ व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला आहे. शेतकरी कोरोना काळात अधिकच आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीस आला आहे.

आताच कुठे ऊस, गहू, हरभरा, मका व इतर पिकं आमदानीत असताना विद्युत कंपनीने वीजबिले भरा नाही तर वीज खंडित करण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होईल.

यातून शेतकरी आत्महत्येकडे वळेल. वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी ठरवलेली पाच हजार रुपये रक्कम भरण्यास शेतकरी असमर्थ आहेत.

प्रति ग्राहक अडीच हजार, याप्रमाणे वसुली करावी व कुठल्याही परिस्थितीत शेतीपंपाची वीज खंडित करू नये. खंडित झाल्यास पाथर्डी तालुका शेतकरी व पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Comment