ट्रकचालकांना मारहाण करून पैसे लुटले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

नुकतेच राहुरी फॅक्टरीजवळ असलेल्या ढाब्याजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघा ट्रकचालकांवर तिघा लुटारूंनी हल्ला करून त्यांच्याकडील 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

दरम्यान सदर घटना 23 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संतोष बाबासाहेब कटारे (वय 30, रा. हिलालपूर, ता. वैजापूर, जि. अहमदनगर)

यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment