माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-संविधानाचे सामुहीक वाचन करुन, लोणी ग्रामस्‍थांनी भारताचा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा केला. माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले.

प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्‍थामध्‍येही प्रजासत्‍ताक दिन संपन्‍न झाला. करोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यंदाचा प्रजासत्‍ताक दिन साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला.

शाळा, महाविद्यालये सुरु झाले नसल्‍याने दरवर्षी होणारी परेड, सांस्‍कृतीक कार्यक्रम साजरे झाले नाहीत. लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात

आ.विखे पाटील यांनी ध्‍वजारोहन केल्‍यानंतर ग्रामस्‍थांनी संविधानाचे वाचन केले. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, काशिनाथ विखे, एम.वाय विखे, किसनराव विखे, सिनेट सदस्‍य अनिल विखे,

चेअरमन नंदु राठी, चांगदेव विखे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, भाऊसाहेब विखे, राहुल धावणे, संतोष विखे, अनिल विखे, ग्रामविकास आधिकारी कविता आहेर आदिंसह ग्रामस्‍थ उपस्थित होते.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍यावरही प्रजासत्‍ताक दिनाचा सोह‍ळा संपन्‍न झाला. कारखान्‍याचे चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यासह व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू,

कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्‍यासह सर्व संचालक आधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेमध्‍ये संपन्‍न झालेल्‍या ध्‍वजारोहण कार्यक्रमास

संस्‍थेचे अध्‍यक्ष आ.राधाकृष्‍ण विखे पाटील, विश्‍वस्‍त आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, ट्रक्‍स सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, संस्‍थेचे सेक्रेटरी, विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment