…तर आमदार राहुल जगताप पुन्हा विधानसभेवर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदे :– तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहिल्यास विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल जगताप पुन्हा विजय होतील, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.

नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास काय होते याची सुरुवात श्रीगोंद्यात झाली.

न खाऊंगा न खाने दूंगा अशी भाषा वापरणारे मोदी आता प्रत्येक निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडून मते खरेदी करत आहेत.

अडवाणी, वाजपेयींच्या विचारांचा भाजप राहिला नसून नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.शेतकरी, गोरगरिबांसाठी फक्त घोषणा केल्या जात आहेत. ही पद्धत लोकशाहीला घातक आहे, असे पाटील यांनी सांगितले.

बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करताना आमदार जगताप म्हणाले, ज्यांना मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद देऊन मोठे केले, त्यांनीच शरद पवारांना फसवले.

जनतेने मात्र त्यांना घरी बसवले.नगरपालिका निवडणुकीत दोन ‘एसपीं’चा आमच्या एका महिला ‘एसपी’ने बंदोबस्त केला आहे.

विजयाचे शिल्पकार मावळते नगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले, १९९९ मध्ये राजकारणात आल्यापासून मी पाचपुते यांचा गड अनेकदा राखला, परंतु त्यांचे कुरघोडीचे राजकारण व दोन एसपींच्या त्रासाला कंटाळून सोडचिठ्ठी देऊन आघाडीत प्रवेश केला.

मी प्रभाग चारमध्ये प्रचार न करताही मतदारांनी विश्वास टाकून मला निवडून दिले. त्या प्रभागासह सर्वच शहर हायटेक करणार असून स्वच्छ व पारदर्शक कारभार करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Comment