कार दगडावर आदळल्याने दोघे ठार.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डोळासणे शिवारात स्विप्ट कार महामार्गाच्या कडेला असलेल्या दगडावर जोरात आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचा दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

हा अपघातात शुक्रवार (दि.८) रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास झाला आहे.. याबाबत माहिती अशी की, स्विप्ट कार मधून दोघे जण (नावे समजू शकले नाहीत) डोळासणे शिवारात आले असता त्यिांची कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खडकावर जावून जोरात आदळली.

कार मधील एक जण महामार्गावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा महामार्गावर होता. तर एक जण कारच्या बाहेर फेकला गेला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

नांदुर खंदरमाळ गावचे माजी सरपंच भाऊसाहेब भागवत, दिंडोरीचे सभापती उत्तम जाधव यांनीही घटनास्थळी थांबून जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाला दवाखान्यात हलविण्यास मदत केली. पण रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच घारगाव पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघातात स्विप्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात ठार झालेले दोघेही पुणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. 

Leave a Comment