मुलगी पळून गेल्यामुळे तणावाखाली असलेल्या पित्याची आत्महत्या.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जळगाव : साखरपुडा झालेला असतांना मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने तणावाखाली असलेल्या पित्याने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला असता नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार कुसुंबा येथील आईस्क्रीम फॅक्टरीजवळील रहिवासी दत्तु गणपत बगळे (वय ५०) हे पत्नी आशा, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह राहात होते.

हातमजुरी करुन उदरर्निवाह करणाऱ्या दत्तु बगळे यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान मुलगी शिक्षण घेत आहे.

दरम्यान तिचाही काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेला असतांना ती घरुन पळून गेल्याने वडिल दत्तु बगळे हे तणावाखाली होते.

अशातच गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आशा बगळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुलगा विशालसह नातेवाइकांनी तत्काळ औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात हलविले होते.

विशाल आई सोबतच दवाखान्यात थांबलेला होता. दरम्यान, दि. २६ रोजी दुपारी १२ वाजता घरात कुणी नसतांना दत्तु बगळे यांनी राहत्या घरातील सिलींग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, दत्तु बगळे यांचे लहान भाऊ कृष्णा बगळे हे गावातच राहत असून दत्तु बगळे हे घरी एकटे असल्याने कृष्णा यांची पत्नी कविता ही जेवणासाठी त्यांना बोलविण्यास गेली असता घराचा दरवाजा आतून बंद दिसला.

बराच वेळ आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्यांना प्रकार सांगितला तेव्हा शेजारच्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता दत्तु बगळे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

Leave a Comment