#लोकसभा 2019 : पहिल्याच दिवशी २१ जणांनी नेले ३९ अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. पहिल्याच दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली.

या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी, विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी निवडणूक यंत्रणेचे १७ अधिकारी- कर्मचारी या प्रक्रियेसाठी नियुक्त केले आहेत.

आज पहिल्याच दिवशी यांनी नेले अर्ज…

1. रेणावीकर चंद्रकांत दामोधर, सावेडी, अहमदनगर;2अर्ज, 2. दरेकर श्रीधर जाखुजी, अहमदनगर;2अर्ज, 3. पोपळघट कलिराम बहिरु, संगमनेर;3 अर्ज,

4. पाडळे ज्ञानदेव कारभारी, देवगांव, नेवासा;4 अर्ज, 5. वाळके नामदेव अर्जुन, सावेडी, अहमदनगर;4अर्ज, 6. आव्हाड सुधाकर लक्ष्मणराव, मजले चिंचोली, अहमदनगर;4अर्ज,

7. घोरपडे साईनाथ भाऊसाहेब, वैजुबाभुळगाव, ता पाथर्डी ;1अर्ज, 8. रासकर सुरेश मार्तंड, वाडेगव्हाण, ता पारनेर; 1अर्ज, 9. वाघमोडे दत्तात्रय अप्पा, शिराढोण, अहमदनगर; 1अर्ज,

10. लाकुडझोडे विलास सावजी, श्रीगोंदा; 2अर्ज, 11. देठे सुनिल एकनाथ, शेंडी, अहमदनगर;1अर्ज, 12. पाटोळे भास्कर फकिरा, अहमदनगर; 1अर्ज,

13. गायकवाड भागवत धोंडिंबा, मु. कासारे पो, कवठे कमळेश्वर, ता संगमनेर; 1अर्ज, 14. संसारे संदिप तुकाराम, माऊलीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी,अहमदनगर; 2अर्ज

15.गाडेकर निलेश दत्तातत्रय, सावेडी, अहमदनगर;2अर्ज (गायकवाड सबाजीराव महादू, रा पारनेर यांच्या साठी अर्ज नेला), 16. शेख रियाजोदि्दन फजलोदिद्न, झेंडिगेट; 2अर्ज,

17. पवार विजय सोपान, मु, पाडळी, ता जामखेड, जि अहमदनगर; 1अर्ज, 18.बनसोडे शांताराम अंतावन, मु पो साकुरी, ता राहाता जि अहमदनगर; 1अर्ज,

19. ठवाळ अनिल भगवान मु पो आढळगाव, ता श्रीगोंदा, जि अहमदनगर; 1 अर्ज, 20. राऊत सुनिल गंगाधर, मु घुलेवाडी , ता संगमनेर जि अहमदनगर; 2अर्ज, 21. लोंढे प्रकाश अण्णासाहेब, गोविंदपुरा अहमदनगर; 1 अर्ज.

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे दालन, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर हे निश्चित करण्यात आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांना साहाय्य करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १५, अहमदनगर) अजय मोरे यांची नियुक्ती विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

त्यांच्या मदतीसाठी एकूण १७ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत.

नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक ४ एप्रिल (गुरुवार) असून नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ एप्रिल रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल ही आहे.

नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांसह केवळ ४ जणांनाच दालनात येता येईल. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करुन अर्ज भरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment