अहमदनगरमध्ये संग्राम जगतापांना धक्का !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केली.

नगर जिल्हा काँग्रेसने जाहीर केलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

शिवाय, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत लढत असताना, नगरमध्ये मात्र जिल्हा काँग्रेसने थेट भाजपला मदत करण्याची घोषणा केली आहे.

सगळ्या तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांनी आमचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

त्यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी आमचा प्रचार करुन आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. या भूमिकेवर आमच्याशी काँग्रेसने संपर्क साधला नाही.

ज्या माणसाने आमची माणसं निवडून येण्यासाठी प्रयत्न केले, त्या माणसाच्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी दिली.

Leave a Comment