संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यावर काय केले, याचा हिशोब द्यावा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- ‘मी स्वकर्तृत्वावर निवडणुकीत उतरलो आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा असताना नगरच्या जागा यांनी प्रतिष्ठेची केली. मात्र, पवार यांना विखे कुटुबांबद्दल असलेला द्वेषामुळे काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली नाही.

माझ्या पराभवासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात हे नगरमध्ये येऊन थांबले होते. माझे आव्हान आहे, की आणखी कोणी असतील तर त्यांनाही आणा. जनता त्यांना मतपेटीतून निकाल देईल.काष्टी येथे आयोजित प्रचार सभेत डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.

श्रीगोंदे तालक्यात आमचे गाव आहे, असे जगताप सांगतात. मग त्यांनी सांगावे की श्रीगोंदे तालुक्यातील कुकडीच्या पाणीप्रश्नावर अरूण जगताप व संग्राम जगताप यांनी किती आंदोलने केली.

साकळाई पाणी योजनेसाठी काय केले. येथील मतांवर आमदार झाले आणि त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिले आहे. स्थानिक आमदार राहुल जगताप हे देखील अपघाताने आमदार झाले आहेत.

या वेळी सुजय विखे म्हणाले आता पुढील आमदार हे बबनराव पाचपुते असतील. जगताप हे फक्त फेसबुक किंवा सोशल मीडियावर खासदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उत्तरे तयार करून त्यावर लाईक घेऊन निकाल जाहीर करण्याचा नवीन फंडा काढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला दक्षिणेत उमेदवार सापडत नव्हता, म्हणून कोणालातरी उमेदवारी द्यावी लागली, यातच सर्वकाही आले. संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यावर काय केले, याचा हिशोब नगरकरांना द्यावा.

याउलट मी कोठेच पदावर नसताना हजारो रूग्णांना बरे केले. हजारो नागरिकांचा विमा उतरवला आहे. हजारो लोकांची रेशनकार्ड तयार केली आहेत. मागील तीन वर्षांपासून वाडीवस्तीवर जाऊन काम करीत आहे.

Leave a Comment