श्रीगोंदा :- दोन मालमोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता मढेवडगाव येथे घडली.
नगर-दौंड रस्त्यावर बसस्थानकाशेजारी गव्हाचे पोते भरलेली मालमोटार (आरजे ०९ जीडी १६१९) उभी होती. गाडीला रिफ्लेक्टर नसल्याने पाठीमागून आलेल्या बटाटा भरलेल्या मालमोटाराची (आरजे ११ जीए ६१७०) तिला जोरदार धडक बसली.
या अपघातात क्लीनर रामलखन प्रीतमसिंह बघेल(वय २४, पिपुरवा, जि. ढोलपूर, राजस्थान) हा जागीच ठार झाला, तर चालक अमित मिश्रा (वय ३२) जखमी झाला.
दोन्ही गाड्यांतील गहू व बटाट्याचे मोठे नुकसान झाले. दोन्ही गाड्या राजस्थान येथील होत्या. पहाटे अपघात झाल्याने वेळेवर मदत पोहोचू शकली नाही.
गावकऱ्यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
अपघातग्रस्त गाडी रस्त्यावरच असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.पोलिसांनी क्रेन आणून गाडी बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत चालू झाली.
- मोदीना पंतप्रधान बनविण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदारला निवडून पाठवायचे !
- Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं का झालं? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यावर आज स्पष्टच बोलले..
- PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळात निघाली शिक्षक पदांची भरती, आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज!
- Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा फक्त 400 रुपये जमा करून हजारो रुपये कमवा; कसे? जाणून घ्या…
- Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे गड राखतील ? जाणून घ्या सध्याची परिस्थती