डॉ सुजय विखे यांनी पंकजा मुंढे यांच्या सभेकडे फिरवली पाठ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेवासे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले डॉ. सुजय विखे हे नगरच्या निवडणुकीतून निवांत झाल्यावर शिर्डी मतदारसंघात प्रचाराच्या आघाड्या सांभाळतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत त्यांच्या यंत्रणेतील कोणीही दिसले नाही. 

सर्जिकल स्टाईक हा काही लोकसभा निवडणुकीचा विषय नाही, तर या सरकारच्या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासाफाटा येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. 

ग्रामविकास खात्यांतर्गत प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी निगडित काम करण्याचा अनुभव मिळाला. या खात्यांतर्गत विकास निधीचा पाऊस राज्यात पडला. जलसंवर्धन, आरोग्य, घरकुल, रस्ते यामध्ये मोठे काम उभे केले आहे.

काही योजनांमध्ये सर्वात जास्त निधी राज्याला दिला गेला. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील या परिसरात निधीवाटप झाले. 

राज्यात घरकुल वाटपाचे काम एवढे चांगले झाले की केंद्राने १० लाख घरे राज्यासाठी पुन्हा मंजूर केली. त्यामुळे बेघरमुक्त महाराष्ट्र योजना आपण पूर्ण करत आहोत.

मोदी सरकार काळात स्वच्छता अभियान, जनधन योजनांसारख्या योजनांमुळे दलाल संपले. सध्या विरोधकांच्या महाखिचडीचा नेता कोण आहे हे त्यांनाच सांगता येत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिर व मजबूत सरकार देणारे ठरले आहेत. 

Leave a Comment