मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइलवर बंदी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या कामासंबंधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त मोबाइल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणचे २०० मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही. 

तसेच २०० मीटरच्या आतील परिसरात पीसीओ चालू ठेवता येणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोणीही व्यक्ती शस्त्र, क्षेपक काड्यांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू, वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही. 

मतमोजणीचे ठिकाणापासून २०० मीटरच्या आत कोणत्याही पक्षाचे कार्यालय किंवा उमेदवाराचे कार्यालय उघडे राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Leave a Comment