माजी आमदार अनिल राठोडांना आमदारकी नाही ?विधानसभेसाठी भाजप नेत्यांकडून निवडणुकीची तयारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मिळालेल्या दणदणीत यशानंतर स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.

आतापासूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या पाच विद्यमान आमदारांबरोबरच अन्य विधानसभा मतदारसंघातही भाजपची ताकद वाढवण्यासाठी या मतदारसंघातून विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेत नगर शहर मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांना मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे नगर शहर मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, यासाठी स्थानिक नेते वरिष्ठांकडे आग्रह धरणार असल्याचे समजते.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र तथा माजी गटनेते सुवेंद्र गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे हे इच्छुक आहेत.

गेल्या पंचवार्षिक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढले होते. विधासभा मात्र सर्व पक्षांनी स्वबळावर लढवल्या होत्या.

नगर शहर मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिवसेना-भाजपची युती तुटल्याने शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठाेड, भाजपकडून अभय आगरकर व राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप व काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात होते.

लोकसभा निवडणुकीत मात्र सर्वच पक्ष एकत्रितपणे लढले होते. आताच्या लोकसभा निवडणुकीत मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे चित्र वेगळे होते. महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे उमेदवार दिले होते.

परंतु नगरमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार असलेले संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय हे भाजपकडून जगताप यांच्या विरोधात उभे होते.

त्यामुळे विखे यांनी आघाडीचा धर्म न पाळता पुत्राचा प्रचार केला. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते जगताप यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. युतीचे उमेदवार डॉ. सुजय यांच्या प्रचारासाठी मात्र शिवसेना-भाजपच्या सर्वच नेत्यांनी सहभागी झाले होते.

लोकसभा निकालानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय चित्र बदलली आहेत. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. विखे मोठ्या मतांनी निवडून आले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

राज्यात भाजपला मिळालेले यश पाहता प्रथम क्रमाकांचा पक्ष हा भाजप, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. गेल्या विधानसभेला भाजपचे उमेदवार असलेले अभय आगरकर यांना ३८ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती.

ती मते युती नव्हे, तर भाजपची होती. आगरकर यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता. गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्य पाहता आताच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे आणखी मताधिक्य वाढेल,

असा अंदाज असल्यामुळे नगरची जागा भाजपला सोडण्यासाठी नेते आग्रही आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघामधून यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment