विधानसभा निवडणुकीआधी अहमदनगर जिल्हा विभाजन करा अन्यथा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्­नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

लांडगे म्हणाले, जसं जिल्हा विभाजन न करण्याचं त्यांचं ठरलंय, तसं नाईलाजास्तव आमचंही आगामी प्रत्येक निवडणुकात उमेदवार उभे करण्याचं ठरलंय, अशी सडेतोड भूमिका आम्ही घेत आहोत. आमचाही मास्टर प्लॅन तयार असून तो योग्यवेळी जाहीरही करू.

मात्र, दिलेले उमेदवार हे श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या विचाराला समर्थन देऊन राजकारण करण्याच्या पलिकडे जाऊन निश्ि­चतच सर्वांगीण विकास करणारे असतील.

जिल्हा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह महसूलमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा दिलेली आश्­वासने आणि दिलेले शब्द आजतागायत पाळले नाहीत.

त्यामुळे जिल्हाभर नाराजीचे सूर निघू लागले असून सर्वसामान्य जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी मंत्री महोदयांबरोबर सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आदर करत संपूर्ण जिल्हाकांक्षींनी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीला वेळोवेळी लाखमोलाची साथ दिलेली आहे.

कृती समितीने गेले साडेचार वर्षात अतिशय अस्थिर वातावरणात देखील जिल्हा विभाजनप्रश्­नी जनजागृतीचे दृष्टीने अनेक लोकाभिमुख जनआंदोलने यशस्वी केली. याच धर्तीवर संपूर्ण जिल्हावासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

म्हणूनच जिल्हा विभाजन मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, असे सकारात्मक वातावरण असताना देखील या सरकारच्या जाणीवपूर्वक नाकर्तेपणामुळे जिल्हा विभाजन होत नसल्याने सर्वत्र आश्­चर्य व्यक्त होत आहे.

शासनाने जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी जिल्हाकांक्षीचा अंत पाहू नये. आवर्ती-अनावर्ती खर्चाचा विचार करता सर्वात कमी खर्च श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी येणार आहे. निकषांच्या आधारावर श्रीरामपूर जिल्हा करण्याची योग्य वेळ आली आहे.

जिल्हा विभाजनप्रश्­नी कृती समितीसह संपूर्ण जिल्हावासियांचा सरकारवर विश्­वास होता. परंतु, योग्यवेळी विभाजन न झाल्याने जिल्हाभर सर्वत्र तीव्र नाराजीचे पडसाद उमटत आहेत. अशाही अस्थिर वातावरणात देखील आम्ही जनजागृतीच्या दृष्टीने फलक लवकरच लावणार आहोत.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा; अन्यथा तुमचं जसं जिल्हा विभाजन न करण्याचं ठरलंय तसं नाईलाजास्तव आमचंही आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचं ठरलंय, अशी सडेतोड भूमिका राजेंद्र लांडगे यांनी मांडली आहे.

Leave a Comment