भाजप प्रवेश केल्याने विखे पाटील यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आता संघाच्या दक्षेते खाली आहेत. त्यामुळे विखे पाटलांच ‘आगे क्या होता है देखना पडेगा’, अशी खोचक टीका केली आहे.

यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही आणि संविधानाला मानणारा पक्ष आहे,

त्यामुळे इथे लोकशाही प्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वातंत्र्य होते. आता ते भाजपमध्ये गेल्याने त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे त्यांचे ‘आगे क्या होता है देखना पडेगा’. काँग्रेसमध्ये पाहिजे त्या पद्धतीने विखे पाटील काम करून घेत होते, त्यासाठी त्यांना अडचणी नव्हत्या. आता मात्र त्यांना दक्ष राहावे लागेल

संविधानाला न मानणाऱ्या व त्या विचारांच्या संघटनेचे आता त्यांना ऐकावे लागणार आहे. तुम्हाला आमच्या आदेशाप्रमाणेच वागावे लागेल असे संघाचे आहे. त्यामुळे संघाची दक्षता काय असते त्यांना आता शिकायली मिळेल.

Leave a Comment