राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला आ. जगताप – पिचड यांची गैरहजेरी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे व अंकुश काकडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी दि. २५ जुलै रोजी घेण्यात आल्या.

कर्जत – जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली. तर या मुलाखतीला आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड यांनी दांडी मारली. या दोन आमदाराच्या गैरहजेरीने राष्ट्रवादी भवनात चर्चेचा विषय होता.

नगर शहरासाठी माजी महापौर अभिषेक कळमकर हे देखिल इच्छूक असून आ. संग्राम जगताप यांच्यावतीने प्रकाश जगताप यांनी हजेरी लावली. आ. संग्राम जगताप यांच्याऐवजी त्यांचे वडिल आ. अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी भवनात आले होते.

विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यात इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात निवडणूकींची तयारी जोरात सुरू केली. राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी बारा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मुलाखती देण्यासाठी कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते.

कर्जत – जामखेडसाठी रोहित पवार, पारनेरसाठी नीलेश लंके आणि सुजित झावरे, प्रशांत गायकवाड , माधवराव लामखडे यांनी मुलाखती देत एकमेकांवर गुगली टाकली.

राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुलाखती देण्यासाठी अकोलेचे आ. वैभव पिचड आणि नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी पाठ फिरविल्याने व मुलाखतीस दांडी मारल्याने राष्ट्रवादी भवनात नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुलाखती देण्यासाठी अकोलेचे आ. वैभव पिचड आणि नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी पाठ फिरविल्याने व मुलाखतीस दांडी मारल्याने राष्ट्रवादी भवनात नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.

Leave a Comment