कोपरगावात डेंग्यूसदृश तापाचे हजारावर रुग्ण आढळले, नागरिकांत घबराट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव –  महापुरानंतर आजारांमध्ये वाढ झाली. डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण घरोघर आढळत आहेत. साचलेली डबकी, दलदल यामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ताप, थंडी, मलेरिया, तसेच सर्दी-पडशाने त्रस्त आहेत. 

ग्रामीण रुग्णालयासह सर्वच रूग्णालये भरली आहेत. डेंग्यूसदृश तापाचे हजारावर रूग्ण आढळल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. त्यामानाने वै़द्यकिय सोयी-सुविधा त्रोटक आहेत. 

ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, शहरातील बालरुग्णालयात, तसेच विविध रूग्णालयांमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळले आहेत. 

पालिकेने स्वच्छता मोहीम राबवली, परंतु अनेक प्रभागांत अजून घाणीचे साम्राज्य आहे. आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत. 

Leave a Comment