Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtra

पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच अटलजींना श्रद्धांजली

अहमदनगर :- देशात भाजपची सत्ता आली आहे आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांना नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. 

भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा भाजपतर्फे भाजप कार्यालयात माजी खासदार गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी त्यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस किशोर बोरा, विस्तारक विवेक नाईक, सुवेंद्र गांधी, मध्यमंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, भिंगार मंडलाध्यक्ष शिवाजी दहिहंडे, चेतन जग्गी, हरिभाऊ डोळसे, वसंत राठोड, विश्वनाथ पोंदे, अभिजित ढोणे, पीयूष जग्गी, सुनील तावरे, दीपक उमप, उमेश साठे, प्रशांत मुथा, यश शर्मा, गणेश साठे, मनेष साठे, संदीप पवार, अशोक भोसले, संदीप पवार, संतोष शिरसाठ उपस्थित होते. 

गांधी म्हणाले, स्वर्गीय वाजपेयी यांचा व माझा संबंध १९८० साला पासूनचा. तत्कालीन नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष असतांना २४ एप्रिल १९८६ साली नगर भाजपच्या वतीने त्यांना समारंभापुर्वक ११ लाखाची थैली दिली होती.

तसेच त्यांच्या शुभहस्ते पालिकेच्या रक्तपेढीचे उत्घाटनही झाले होते. यासर्व आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने १९९९ साली प्रथम खासदार झालो. त्यांच्याच मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी मिळून २००३ साली मी जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

तसेच २००० साली अटलजींनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत देशातील पहिल्या रस्त्याचे भूमिपूजन माझ्या मतदार संघात झाले. याचा मला अभिमान आहे. पोखरणचा अणु स्पोट करून त्यांनी भारतही एक शक्तिशाली देश असल्याचे दाखवून दिले. अशा महान बहुआयामी व्यक्तिमत्वास प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहतांना अजूनही मन भरून येते. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button