प्रताप ढाकणे यांना भाजप प्रवेश मिळाला तरी उमेदवारी नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाथर्डी :- पक्षात कोणाला यायचे तर या, पण उमेदवारी मात्र मोनिका राजळेंनाच असेल. काही जण शेजारी जातात (बीड जिल्हा), पण काही उपयोग नाही. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी अहवाल दिला आहे, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असले, तरी उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मंगळवारी दिले.

मागील आठवड्यात वैद्यनाथ साखर कारखान्यावर प्रताप ढाकणे व मंत्री पंकजा मुंडे यांची इनकॅमेरा चर्चा झाली. तो संदर्भ देत डॉ. विखे यांनी राजळेंना दिलासा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २५ ला महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत येत आहेत. त्याच्या नियोजनासाठी राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार राजळे, जनादेशयात्रा समन्वयक प्रसाद ढोकरीकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, गटनेते सुनील ओव्हळ, सोमनाथ खेडकर, राहुल राजळे, काशीबाई गोल्हार, सुरेखा ढाकणे, ज्योती मंत्री, नगरसेवक रमेश गोरे, बाळासाहेब अकोलकर, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगावचे भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, भगवान साठे या वेळी उपस्थित होते.

वांबोरी चारीचा विषय मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावून टप्पा क्रमांक दोनबाबत लक्ष वेधू, असे सांगून खासदार विखे म्हणाले, राहुरी, नगर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील सिंचन क्षेत्र चारीच्या पाण्यावर अवलंबून असून पाथर्डी तालुक्यातील सर्व १०२ पाझर तलाव भरून मढीपर्यंत चारीचे पाणी आणण्याची मी व आमदार राजळे मिळून पार पाडू. प्रवरा उद्योग समूहाचे ३० कर्मचारी चारी परिसरात देखरेख करतील. राज्यातून बाहेर जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागासह अन्यत्र वळवण्याचा आराखडा राज्याने केंद्राकडे सादर केला आहे. निधी मंजूर होताच या कामाला प्रारंभ होईल.

Leave a Comment