प्रवीण चौगुलेच्या निष्ठेला सलाम – आ. जितेंद्र आव्हाड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे : सध्या राज्यात पळवापळवी सुरू असतानाच प्रवीण चौगुले या विटाव्यातील तरुणाने आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे समर्थन करणार नाही. पण, त्याने दाखवून दिलेली ही निष्ठा महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी आहे.

त्यामुळे त्याला माझा सलाम आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण चौगुले या तरुणाला आदरांजली अर्पण केली आहे.. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विटाव्यातील प्रवीण चौगुले याने आत्मदहन केले.

याबाबत आ.आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करून प्रवीण चौगुले याला आदरांजली अर्पण केली आहे.. आ. आव्हाड म्हणाले की, जागोजागी निष्ठेची विष्ठा होताना दिसतेय; पळवापळवी सुरू आहे. ४०-४० वर्षे लोकं सत्तेत आहेत. ते आता सोडून जाताहेत; अन् अचानक बातमी येते की, प्रवीण चौगुले नावाच्या मनसैनिकाने आत्महत्या केली.

आपल्या नेत्याला त्रास होतोय; आपला नेता अस्वस्थ आहे. आपला नेता कुठे तरी अडचणीत आहे. ही अस्वस्थता त्याला इतकी सतावत होती की त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणे चूकच आहे; त्याचे समर्थन करत नाही.

पण, ही निष्ठा कुठे बघायला मिळणार? आपल्या नेत्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर; आपल्या नेत्याला काही होता कामा नये, ही भावना आजच्या युगामध्ये दिसते कुठे? खासकरून महाराष्ट्रात जे काही चालू आहे. तिथे तर ही निष्ठा दिसतच नाही..

प्रवीण चौगुलेकडे सत्ता नाही, पैसा नाही, आधार नाही. घर नाही; मायबाप नाही; काही नाही. पण, फक्त नेत्याच्या प्रेमापोटी या माणसाने आपला जीव दिलाय. निष्ठेचे एवढे मोठे उदाहरण मी गेल्या कैक वर्षात पाहिलेले नाही.

सलाम प्रवीण चौगुलेला अन् नशीबवान राज ठाकरे यांना. महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रवीणने वेगळी दिशा दिली आहे. बघूया पुढे काय होतेय ते, असेही आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे

Leave a Comment