रखडलेले मूलभूत प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले : राठोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचे काम शिवसेनेने केले आहे. आज सुरू करण्यात आलेले रस्त्याचे काम १५ वर्षांपासून रखडले होते. मागील काळात या भागातून निवडून आलेल्या विरोधी नगरसेवकांनी फक्त पदे भूषविली आणि विकासकामांत खोडा घालण्याचे काम केले.

जेव्हा जेव्हा मनपावर युतीची सत्ता राहिली, तेव्हा शहरातील विकासकामांना वेग आला. विरोधकांची सत्ता असताना विकासकामे ठप्प झाली, याची अनेक उदाहरणे देता येतील, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

माजी महापौर सुरेखा कदम यांच्या निधीतून मंजूर असलेल्या नेप्ती रोड ते केडगाव मनपा कार्यालय रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच दत्तात्रेय ठुबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते राठोड बोलत होते.

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेविका सुनीता कोतकर, अंजूम सय्यद, नगरसेवक विजय पठारे, युवा सेनाप्रमुख हर्षवर्धन कोतकर, संजय लोंढे, रमेश परतानी, अविनाश मेहेर, रावसाहेब महाराज भाकरे,राजेंद्र पठारे, अंगद महारनवर, पिंटू मोढवे, नंदू ठुबे, संग्राम कोतकर, दत्ता कोतकर, ओंकार कोतकर, सय्यद महेबूब, अमोल कोतकर, मयूर कोतकर, अक्षय मतकर आदी उपस्थित होते..

Leave a Comment