पोलीस व ग्रामस्थ यांच्यात समन्वय आवश्यक – वैभव पिचड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजूर : पोलीस प्रशासन व ग्रामस्थात समन्वय असल्यास गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वास वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील राजूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजूर येथील शासकीय विश्रामगृहावर ग्रामस्थ, मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार व शांतता कमिटी यांची बैठक मा. आ. वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच संतोष बनसोडे, पं. स. सदस्य दत्तात्रय देशमुख, माजी सरपंच गणपतराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब लहामगे, श्रीराम पन्हाळे,

श्रीनिवास येलमामे, काशिनाथ भडांगे, दीपक देशमुख, शेखर वालझाडे, नीलेश साकुरे, दौलत देशमुख, नंदूबाबा चोथवे, राजेंद्र चोथवे, राजू वराडे, माधवराव गभाले, आयुब तांबोळी, शमशुद्दीन तांबोळी, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.. माजी आ. पिचड म्हणाले, राजूर येथे मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेला प्रकार हा दुर्दैवी होता.

मागील चाळीस-पन्नास वर्षात येथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून गणेशोत्सव व मोहरमसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करीत आहेत. मागील वर्षी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून ती गैरसमजुतीमुळे घडली आहे. पोलिसांबरोबरच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक शांततेत व वेळेत कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, मागील वर्षीच्या दुर्दैवी घटनेने राजूर हे अतिसंवेदनशील म्हणूनप्रशासनाचे लक्ष आहे. राजूर ग्रामस्थ शांतताप्रिय असणारे असून ते पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील व गणेशोत्सव शांततेत पार पाडतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही.

हा उत्सव शांततेत व कोर्टाने दिलेल्या दिशा व निर्देशानुसार वेळेचे भान ठेवून साजरा करा. शांतता कमिटी व पोलीस प्रशासन यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करतील.

Leave a Comment