स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन 11 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शालेय परिसरात श्रमदान केले तेथील विद्यार्थ्यांच्या समवेत आनंदाचा क्षण साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.             

स्वयंभू युवा प्रतिष्ठानची स्थापना दिनांक 12 सप्टेंबर 2017 ला 12 सदस्यांना घेऊन झाली होती. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने एकत्र येऊन स्वयंभू युवा प्रतिष्ठानची स्थापना केली.

सर्वप्रथम गरीब रुग्णांना येणारी रक्ताची समस्या समोर ठेवून गरिबातल्या गरिब व्यक्तीला रक्त मोफत मिळवून देण्यासाठी ‘नातं रक्ताचं’ उपक्रमांतर्गत ब्लड लाईन सुरु केली. आतापर्यंत दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथील ब्लड बँकेला सर्वात जास्त रक्तपिशव्या देणारी संघटना म्हणून स्वयंभू युवा प्रतिष्ठान चा नामोल्लेख होतो.

हात मदतीचा उपक्रमांतर्गत स्वयंभू युवा प्रतिष्ठानने उत्कर्ष बालघर नेप्ती येथील अनाथ व वंचित मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य प्रतिष्ठान कडून वेळोवेळी पुरवले जाते. तसेच प्रतिष्ठानच्या सदस्यांचे वाढदिवस या मुलांच्या सानिध्यात साजरे केले जातात.

मातोश्री समान शिक्षिका प्राध्यापिका  भारती दानवे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रम विळद येथे साजरा केला. यानिमित्ताने वृद्धाश्रमात मोठ्या प्रमाणावर श्रमदान व वृक्षारोपण करण्यात आले तसेच ‘गड संवर्धन’ उपक्रमा अंतर्गत ऐतिहासिक तसेच धार्मिक ठिकाणाचे महत्त्व टिकवण्यासाठी व तेथे स्वच्छता टिकवण्यासाठी प्रतिष्ठान नियमित कार्यरत असते.           

स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या या कार्याला न्यू आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर चे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे सर,उपप्राचार्य आर.जी.कोल्हे,प्रा.डॉ.बी.बी.सागडे,प्राध्यापिका भारती दानवे,प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया,उत्कर्ष बालघर चे संचालक अंबादास चव्हाण,सिव्हिल सर्जन डॉ.प्रदीप कुमार मुरंबीकर,डॉ. सुमय्या खान,डॉ.प्रवीण अहिवळे,विजयभैया भंडारी,तसेच माय टिफिन सर्विस संस्था,हिरामोती फुड्स प्रा.लि.यांचे मार्गदर्शन लाभले.           

या दोन वर्षाच्या प्रवासात स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. स्वयंभू प्रतिष्ठान च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव मुनोत यांनी प्रतिष्ठानच्या यशस्वीतेचे कौतुक करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमा प्रसंगी स्वप्नील फिरोदिया,अक्षय सुपेकर,भाऊसाहेब गोरे,रघुनाथ खामकर,भरत कवडे,मोहन  भोसले,विजयभैया भंडारी,दत्तात्रय ढगे, गोवर्धन कार्ले,झेंडे सर,खामकर सर तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment