अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगांव ;- गेल्या पन्नास वर्षापासून दोन कुटुंबांच्या हातात गुरफटून पडलेल्या सत्तेला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील जनतेनेच आता पक्का निर्धार केला असून अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही, असा निश्चय जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी कोपरगांव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून दाखविला.

कोपरगांव विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेत सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते.

गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव हे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येवून दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील जनतेने पन्नास वर्षापासून दोन परिवाराच्या हातात सत्ता दिली.

परंतु जनतेचा सतत भ्रमनिरास झालेला आहे. तालुक्याचे हक्काचे पाणी या प्रस्तापित मंडळींना सांभाळता आले नाही. आपले हक्काचे पाणी आपल्या डोळ्यासमक्ष म राठवाड्याकडे जात असताना शेतकऱ्यांना ते पाहण्याशिवाय काहीच करता आले नाही.

माजी केंद्रीय मंत्री पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांना सोबत घेवून महाराष्ट्रातील वर्तमान आणि भविष्यातील पाण्याच्या संकटाबाबत सखोल अभ्यास करुन पश्चिम घाटमाथ्यावर पडणार आणि समुद्राला जाऊन मिळणारे पावसाचे पाणी गोदावरी खाऱ्यात वळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्ताव तयार करुन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खा. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तो सादर केला होता. परंतु त्यांनी प्रस्तावावर फारसा गांभिर्याने विचार केला नाही.

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांनी पुणे येथे या प्रस्तावावर चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रस्तावातील गांभिर्य लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्यावर विचार करण्याचे ठरविले आहे.

लवकरच हा प्रश्न मार्गी लागून नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना या जिल्हातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. लोकांनी मला कोपरगांव तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासनही श्री परजणे यांनी दिले.

Leave a Comment