कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची व निवडणूक शाखेची जाेमात तयारी सुरू आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शाखेच्या वतीने प्रशिक्षण वर्ग, बारा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती व विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शासकीय बैठका होत असून मतदारांच्या सेवेसाठी चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुरू होत आहे.

लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या सी व्हिजिल या App चाही या निवडणुकीत वापर केला जाणार आहे. याद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करता येणार आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लवकरच सी व्हिजिल कक्ष सुरू होत आहे.

मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप होत असल्यास, शस्त्रसाठा अथवा शस्त्राचा वापर होत असल्यास, मतदारांना मारहाण तसेच दमबाजी होत असल्यास, चिथावणीखोर भाषण केले जात असल्यास, पेड न्यूज व फेक न्यूज लक्षात आल्यास,

मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर होत असल्यास, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक होत असल्यास, उमेदवाराची मालमत्तेबाबत व विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाइल App वर तक्रार करता येते.

Leave a Comment