पोलिसात तक्रार दिली म्हणून पती-पत्नीस मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर : शेतजमिनीच्या कारणावरून पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. म्हणून त्याचा राग अनावर झाल्यामुळे बारा जणांनी एकत्र येत पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एकूण बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. येथील घटना याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकलापूर गावाअंतर्गत असलेल्या शेळकेवाडीनजीक गारेवाडी या ठिकाणी गणपत पाराजी गारे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत.

गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भाऊसाहेब भागा गारे, संतोष भागा गारे, उल्हास दगडू गारे, प्रभाकर दगडू गारे, ज्ञानदेव महादू गारे, तानाजी किसन गारे, सखूबाई भागा गारे, कविता भाऊसाहेब गारे, सोनाली ज्ञानदेव गारे,

मंदा तानाजी गारे, अनिता उल्हास गारे, सुरेखा प्रभाकर गारे या सर्वांनी एकत्र येत ‘तू आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली’ म्हणून या बारा जणांनी पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे.

याप्रकरणी गणपत गारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील बारा जणांविरुद्ध गु. र. नं. २२२/२०१९ भा. दं. वि. कलम ३२३, ३४१, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहेत.

Leave a Comment