काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- काँग्रेसची अंतिम यादी निश्चित झाली असून आम्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. काँग्रेसमधून आजपर्यंत अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, आता सकाळपासूनच आमच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

उमेदवारांची यादी जाहीर करू नका, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. थोरात शनिवारी संगमनेरमध्ये होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सत्ताधारी पक्षातदेखील अनेक लोक नाराज आहेत. कालपर्यत ते आमच्या संपर्कात नव्हते, आमची उमेदवारी यादी निश्चित झाली, आचारसंहिता लागली आणि आमच्यासोबत पक्षात येणाऱ्यांचे संपर्क सुरू झालेत. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसचे काम राज्यात सुरू होते.

आम्हीदेखील दोनदा यात्रा काढल्या. अनेक प्रश्नांवरून आंदोलने केलीत, सध्याच्या सरकारकडे अपयशी सरकार म्हणून लोक बघत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे, युवकांचे रोजगाराचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे सरकारविरोधात नाराजीचा सूर असून जनता आमच्यासोबत राहील.

भाजप-सेना युती होवो अथवा न होवो, आम्ही मात्र निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत. त्यांच्या युतीचा अथवा युती न होण्याचा फायदा-तोटा याचा आम्ही विचार करत नाही. युती करताना शिवसेना काहीही करायला तयार असल्याचे दिसते.

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपात शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे दिसते. राज्यातील प्रचारामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचारासाठी यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांची जर आवश्यकता असेल, तर आम्ही त्यांना प्रचारासाठी येण्याचा आग्रह धरू, असं त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment